गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे मावा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह आरोपीस गजाआड करण्यातआले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की शनिशिंगणापूर ते सोनई रोडवर असलेल्या चार नंबर चारीवर कारखाना परिसरात आरोपी तय्युब बिबन शेख रा. पानसवाडी व जितेंद्र नरेंद्र चांडक उर्फ जितु मालपाणी रा.संभाजी नगर हे त्या ठिकाणी मावा तयार करण्याचे काम करत असताना मिळुन आले.दि.४ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्या ठिकाणी कारवाई करत त्या ठिकाणाहून तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये विस हजार रुपये किंमतीचा तयार मावा,

सात हजार पाचशे रुपयांची पाच किलो सुगंधी तंबाखू, पन्नास हजार रुपये किंमतीचे तयार करण्यासाठी लागणारे मशीन, तिन हजार रुपयांचे मिक्सर, शंभर रुपयांच्या प्लास्टिक च्या पिशव्या असा रुपये ८०.६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पैकी एका आरोपीस ताब्यात घेण्यास पोलीसांना यश आले तर दुसरा फरार झाला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस काॅस्टेबल विशाल तनपुरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा र. नं. २५४/२०२५ बिएनएस चे कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई बाबासाहेब लबडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.