ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अध्यक्ष

सोनई – उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणप्रेमी नागरिक अतुल भदगले यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष संभाजी सानप यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे आणि मुख्याध्यापक रावसाहेब सोनसळे यांनी प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले.

सदर विद्यालयात सध्या ८५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अध्यापनाबरोबरच धार्मिक शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा क्षेत्रात विशेष मार्गदर्शन आणि स्वयंशिस्तीवर भर देणारे हे विद्यालय परिसरात आपली विशेष ओळख निर्माण करत आहे. संत किसनगिरी बाबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून, येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी वन अधिकारी, पीएसआय, डॉक्टर आदी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

अध्यक्ष

शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या वेळी बोलताना मुख्याध्यापक रावसाहेब सोनसळे यांनी विश्वास व्यक्त केला की, “सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नक्कीच विद्यालयाच्या प्रगतीसाठी समर्पित राहतील आणि संस्थेच्या नावलौकिकात भर घालतील.”

उदयन गडाख यांनी देखील आपल्या मनोगतात सांगितले की, “शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा आमचा प्रयत्न आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ही संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”

अध्यक्ष

कार्यक्रमात समितीचे सदस्य आणि उद्योजक संदीप काळे यांनी शाळेची होत असलेली शैक्षणिक व भौतिक प्रगती कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, “शाळेसाठी आम्ही सदैव सहकार्य करण्यास तत्पर आहोत” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर कर्डिले यांनी केले.

अध्यक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अध्यक्ष
अध्यक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *