नेवासा – दिनांक २४/०९/२०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांनी निमगाव पागा-कोतूळ रोडवर, कोतूळ शिवार, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, येथे गुप्त बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाले वरुन अवैध देशी दारूची वाहतूक करताना ०१ चारचाकी वाहन क्र. MH.12.EG.9068 या वाहना मध्ये देशी दारू बॉबी संत्राचे एकूण 44 बॉक्स जप्त करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर कारवाई देशी दारू ३८३.०४ बल्क लिटर जप्त करण्यात आलेले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत ६,०२,२४०/-रु इतकी आहे. सदर कारवाई मध्ये एकूण आरोपी नामे १) विशाल पोपट निळे, वय-२५ वर्ष रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर जि. अहिल्यानगर २) राजेंद्र बाळासाहेब तांबे, वय-२७ वर्ष रा. मु.पो.पेमगिरी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर ३) अक्षय वाघचौरे वयः २८ वर्ष (संशयित फरार) ०३ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे.

सदरील कारवाई श्री. सागर धोमकर विभागीय उपायुक्त रा. उ. शु. पुणे विभाग पुणे, श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर, श्री. प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर, श्री. अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.एस.सी. मांडवेकर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर जवान सर्वश्री. यु.डी. काळे, ओ.बी. पालवे यांनी सहभाग घेतला आहे. पुढील तपास हा संदीप मांडवेकर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर जि. अहिल्यानगर हे करीत आहे.

तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, मद्य खरेदी करताना परवानाधारक दुकानातून करावी तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री, वाहतूक संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. १८०० २३३ ९९९९, ८४२२००११३३ तसेच ०२४२२-२२९५५५ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

