नेवासा – श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा (रासेयो) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट होते.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक श्री. महेश मापारी यांनी मार्गदर्शन केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ आगळे, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश गारुळे व डॉ. कार्तिकी नांगरे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या प्रभावी भाषणात श्री. मापारी यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट कौशल्य दडलेले असते, फक्त त्याचा शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले. बाबा आमटे यांचे कुष्ठरोग निर्मूलनासाठीचे कार्य व नगरचे धामणे दांपत्य यांचे मनोरुग्णांसाठीचे योगदान यांचा दाखला देत त्यांनी स्वयंसेवकांना समाजसेवा व स्वतःचा विकास यांचा समन्वय साधण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. घनवट यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तसेच बाहेरील विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. डॉ. नवनाथ आगळे यांनी प्रास्ताविकात रासेयो स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली, तर आभार प्रदर्शन डॉ. कार्तिकी नांगरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश गारुळे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

