घोडेगाव

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये यांना गुप्त माहिती मिळाली की काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बऱ्हाटे वस्ती येथे डांबून ठेवलेले आहे. त्या माहिती च्या आधारे दि. ३ रोजी त्या ठिकाणी जावुन पहाणी केली असता एम एच १७ बि डी ०११२ क्रमांक असलेल्या पिक अप व त्यामध्ये काही जनावरे डांबून ठेवलेले परिस्थितीत मिळाले तसेच काही बाजुला डांबून ठेवलेले मिळुन आले. त्या ठिकाणाहून पाच लाख रुपये किंमतीचा एक पिक अप, एक लाख साठ हजार रुपये किंमतीची गोवंशीय जातीचे जनावरे असा एकुण सहा लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घोडेगाव

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी वरुन आरोपी आसिम आतिक शेख रा. चांदा व अविनाश मोहन बऱ्हाटे रा. घोडेगाव (बऱ्हाटे वस्ती) यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. ३७१/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण चे कायदा कलम ५(अ), (ब), ९(ब), प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम ३,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक घाटकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरप्पा करमल,पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस काॅस्टेबल विशाल तनपुरे, सहाय्यक फौजदार रामभाऊ भांड यांच्या पथकाने केली.

घोडेगाव
घोडेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घोडेगाव
घोडेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घोडेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!