घोडेगाव – दि. ७ ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल, काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत घोडेगाव (ता. नेवासा) येथील संजय नामदेव चौधरी यांचे चिरंजीव पै. सत्यम चौधरी या आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूने 14 वर्षाखालील 35 किलो वजनगटात प्रेक्षणीय खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले.
त्याच्या या यशामुळे आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले असून, घोडेगावसह संपूर्ण नेवासा तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

सत्यमच्या या यशामागे प. पू. सदगुरु आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशिर्वाद, तसेच आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक मा. वस्ताद भरत नायकल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पै. विवेक नायकल, एनआयएस कुस्ती कोच पै. अशोक पाटील, आणि एनआयएस कुस्ती कोच पै. अक्षय डांगे यांचेही मोलाचे योगदान या यशात राहिले आहे.
पै. सत्यम चौधरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मा मालिक संस्था, प्रशिक्षकवर्ग व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.