सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना लि.सोनई चे कामगारांना मागील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे वेतनाची १३ टक्के प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची एकूण रक्कम २ कोटी ८५ लाख चे वाटप शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.
कारखान्याचे व्यवस्थापन व कामगार युनियनचे पदाधिकारी अध्यक्ष अशोकराव पवार, उपाध्यक्ष कारभारी लोडे, सचिव डि.एम. निमसे, सहसचिव भारत पटारे, खजिनदार सुभाष सोनवणे, यांचेमध्ये चर्चा होऊन कामगारांना बोनस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या कामगारांना मागील वर्षाच्या वेतनाच्या १३ टक्के रक्कम एकरकमी शुक्रवार पर्यंत वर्ग कऱण्यात येईल असे संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी जाहीर केले तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

मुळा कारखान्याच्या संचालक मंडळाने बोनस बाबत चांगला निर्णय घेतल्याबद्दल कामगार युनियनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, सेक्रेटरी रितेश टेमक यांचे अभिनंदन करुन आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले, मॅनेजर व्ही.के. भोर, वित्त व्यवस्थापक टी.आर. राऊत, प्रशासकिय अधिकारी संजय टेमक, योगेश घावटे,दीपक अपार उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.