गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सध्या पोलीसांनी कारवाई चा बडगा उगारला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. सागर राधाकीसन सोनवणे (वय.28) रा. घोडेगाव हा चांदा रोडवर असलेल्या आपल्या किराणा दुकानात विनापरवाना विविध कंपन्यांचा गुटखा विक्री करताना आढळुन आला. त्याच्या कडून 1536 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल महेंद्र पवार यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. 413/2025 बिएन एस चे कलम 223,274,275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे बाळु साहेबराव शिंदे (वय.40) रा. सोनई हा येथील एरीकेशन कॅालनी येथे एका राहत्या घरामध्ये काही तरी मालाविरुध्दचा गुन्हा करण्याचे उद्देशाने लपवून बसलेला आढळुन आला.पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सोनई येथील प्रल्हाद यादगीर पालेपवार (वय.36) हा मुळा कारखाना येथे एका टपरीमध्ये विनापरवाना गावठी हातभट्टी ची तयार दारू विक्री करताना आढळुन आला 2500 रुपये किंमतीची 25 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. पोलीस काॅस्टेबल गणेश गावडे यांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा वामन गर्जे (वय.31) हा मुळा कारखाना येथे एका टपरीमध्ये कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळुन आला. त्याच्या विरुद्ध पोलीस काॅस्टेबल गणेश गावडे यांनी फिर्यादी दाखल केली आहे. बाबासाहेब कचरु भोसले (वय.48) रा. सोनई हा गावातील दहाव्या च्या ओट्याजवळ एका टपरीमध्ये कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळुन आला. त्याचे विरुद्ध पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत. पोलिसांनी अवैध धंद्यांवर सुरू केलेल्या या कारवाई मुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाया अशाच पुढे सुरू राहणार आहेत. या पुढे अवैध धंद्यांवाल्यांची गय केली जाणार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सांगितले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

