एसटी

सोनई /शनिशिगंनापूर — महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 2020 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना करारापोटी मिळणारी वाढीव रक्कम एकरकमी न देता 48 हप्त्यांत (चार वर्षांत) देण्याचा निर्णय घेतल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, जर एकरकमी रक्कम मिळाली नही तर आंदोलन करण्याचा इशारासंघटनेचे वतीने देण्यात आला आहे., 3 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्याची आणि देय रक्कम एकरकमी देण्याची मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्भर सेवानिवृत्त कर्मचारी
कार्यरत असताना कर्मचाऱ्यांचे कामगार करार होणे बाकी होते. अखेर मागील वर्षी करार झाला आणि त्या करारात वाढीव रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावी, असा नियम आहे. मात्र, महामंडळाने या रकमेचे 48 हप्त्यांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व मानसिक त्रासदायक आहे.

एसटी


या निर्णयाविरोधात अहिल्यानगर विभागासह संपूर्ण महाराष्ट्रभर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. , जर शासन व महामंडळाने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात येईल.
सदर निवेदन परिवहन महामंडळाचे अधिकारी बाळासाहेब एकशिंगे व नितीन गटणे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बलभीम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, खजिनदार विठ्ठल देवकर, अण्णासाहेब आंधळे, उत्तम गर्जे,रामभाऊ कराळे, मुठाळ, यांच्यासह 2020 ते 2024 करारातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुठाळ यांनी कामगार कराराची पार्श्‍वभूमी आणि महामंडळाने केलेला अन्याय यावर सविस्तर विश्‍लेषण मांडले. ते म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे ज्येष्ठ नागरिक. त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला एकरकमी मिळावा, ही न्याय्य मागणी आहे. महामंडळाने हप्त्यांचा निर्णय रद्द करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखावा.अन्यथा आंदोलन करण्याचा
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बलभीम कुबडे यांनी इशारा दिला.

एसटी
एसटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *