श्रीरामपूर- या बातमीची हकीगत अशी की, श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, रमिझराजा आतार, अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
नमुद पथक हे दिनांक 14/11/2025 रोजी श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पोनि/किरणकुमार कबाडी यांना बातमीदाराकडुन 3 इसम हे त्यांचेकडील कारमधुन गावठी कट्टा (अग्निशस्त्र) विक्री करीता बेलापुर या ठिकाणावरुन श्रीरामपुर कडे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदर बातमीची माहिती पथकास कळवुन खात्री करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश देण्यात आले.

पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे श्रीरामपुर ते बेलापुर जाणारे रोडवर अनारसे हॉस्पीटलचे समोर रोडलगत सापळा रचुन थांबले असता बातमीतील वाहन येतांना दिसले. पथकाने सदर वाहन थांबवुन त्यामधील इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) आनंदा यशवंत काळे वय – 44 वर्षे, रा. रेणुकानगर, 51 नं. रेल्वे गेट जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, 2) विशाल बबन सोज्वळ वय – 28 वर्षे, रा. रेणुकानगर, दत्तनगर रोड, विश्वकर्मा मंदीराचे पाठीमागे श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, 3) विजय यशवंत काळे वय – 48 वर्षे, रा. निलकंठ ड्रिमस् शांताई रेसिडेन्सी शेजारी, थत्ते ग्राऊंड, वार्ड नं. 7 श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांची व त्यांचे ताब्यातील कारची झडती घेता कारचे डॅशबोर्डचे डिक्कीमध्ये 35,000/- रुपये किमतीचा 01 गावठी कट्टा (अग्निशस्त्र), 2000/- रुपये किमतीचे 04 जिवंत काडतुसे, 7,00,000/- रुपये किमतीची होंडा कंपनीची होंडा सिटी कार क्रमांक एम.एच. 03 सी.एस.9466 असा क्रमांक असलेली, 45,000/- रुपये किमतीचे 03 मोबाईल असा एकुण 7,82,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील इसमांना मुद्देमालासह श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करुन त्यांचेविरुध्द पोकॉ/203 रमिझराजा रफिक आतार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1010/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ. क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 56/2019 भादवि कलम 394,34
2 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 318/2018 भादवि कलम 392,34
3 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 309/2016 भादवि कलम 379
4 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 254/2011 भादवि कलम 399
5 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 239/2019 भादवि कलम 380,452
6 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 201/2008 भादवि कलम 380,452
7 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 134/2011 भादवि कलम 379
8 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 1046/2020 भादवि कलम 392,34
9 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 286/2021 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

