घोडेगाव – सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील हॉटेल धनश्री येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान हॉटेल चालकावर सशस्त्र हल्ला झाला होता याबाबत लखन गंगाधर जगदाळे यांनी दिलेल्या सोनई पोलीस ठाण्यात एकूण सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील सर्व आरोपी फरार होते यातील फरार आरोपी सौरभ उर्फ शेंग्या गजभिव (वय २२) रा. राजवाडा, सोनई याला घोडेगाव चांदा रोडवर जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली कि सौरभ उर्फ शेंग्या गजभिव हा चांदा घोडगाव रोडने सोनई कडे येते असल्याची माहिती मिळाली. लागलीच स्थानिक गुन्हे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये,पोलीस नाईक सोमनाथ झांबरे,पोलीस हवालदार हृदय घोडके, दिपक घाटकर, सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, आकाश काळे, प्रकाश मांडगे, बाळासाहेब खेडकर,चालक चंद्रकांत कुसळकर यांनी आरोपीला चांदा घोडेगाव रोडवर जेरबंद करण्यात आले .

याबाबत दि.३ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सोनई येथील बेल्हेकरवाडी रोड परिसरातील हॉटेल धनश्रीचे चालक लक्ष्मण गंगाधर जगदाळे वय-३८ हे हॉटेलवर काम करत असताना मोटरसायकलवर आरोपी हॉटेल आले.हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण जगदाळे यांच्या धनश्री हॉटेलच्या गल्यातुन आरोपीनीं २७०० रुपये बळजबरीने काढून घेत असताना हॉटेल चालक जगदाळे यांनी विरोध केला असता आरोपीनीं त्याच्या हातातील धारदार चाकुने हॉटेल चालक जगदाळे यांच्या पोटावर,डाव्या बरगडीजवळ व कत्तीने गळाच्या डाव्या बाजुला वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करुन जखमी केले होते. त्यानंतर जगदाळे यांना सोनई येथील शताब्दी हॉस्पिटल व अहिल्यानगर साईदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर जगदाळे यांनी दिलेल्या जबाबा वरून सोनई पोलीस ठाण्यात सहा आरोपी विरोधात दि. ८डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल चालक जगदाळे यांच्या फिर्यादी वरून आरोपी सचिन काकडे,सौरभ उर्फ शेंग्या गजभीव,आकाश काकडे,जेकब साळवे सर्व राजवाडा सोनई, सनी उर्फ मध्या शिंदे रा. वडार गल्ली, सोनई ता नेवासा,दादासाहेब वैरागर रा.राजवाडा, सोनई, तसेच इतर ३ अनोळखी इसम यांच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर -४५५/२०२५ बी.एन.एस.कलम २०२३ चे कलम ३११,६१(२), ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच यातील सर्व आरोपी फरार झाले होते.पोलीस कसून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने यातील एका आरोपीला जेरबंद केले. उर्वरित सर्व आरोपी लवकरात लवकर पकडण्यात येतील असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या हल्ल्या नंतर सोनई परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

