घोडेगाव – चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात व्यवहारातून झालेल्या वादात एकाचा गावठी कट्यातुन गोळीबार करून खुन करण्यात आला होता. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या.. या बाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ११ रोजी शाहिद राजमहंमद शेख वय २२ वर्षे, रा. चांदा हा त्याचे मित्रासह चांदा परिसरामध्ये कंदुरीचे कार्यक्रमासाठी गेला होता. कंदुरीचे कार्यक्रमामध्ये मयत शाहिद राजमहंमद शेख याचे सुरज लतिफ शेख व अक्षय बाळु जाधव यांचेशी वाद होवुन आरोपी यांनी शाहिद शेख याचे छातीमध्ये गावठी कट्टयातुन फायर करुन त्याचा खुन केला होता .
सदर खुनाचे घटनेबाबत फिर्यादी यासीन इब्राहिम शेख यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ११/२०२६ बिएन एस चे कलम कलम १०३ (१), ३(५) सह आर्म ऍ़क्ट ३/२५, ७, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देवुन घटनेचे गांभीर्य पाहुन आरोपींचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेची ३ पथके तयार करुन सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरची पथके रवाना करण्यात आलेली होती.

सदर पथकांनी घटनास्थळी जावुन आरोपींबाबत माहिती घेवुन गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली. सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना दिनांक १३ रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी सुरज शेख हा बाभळेश्वर, ता. राहाता परिसरामध्ये लपुन बसलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ बाभळेश्वर या ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी एक इसम संशयीत रित्या दिसुन आला. सदर इसमाची खात्री करणेकामी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार त्याचेकडे जात असतांना सदरचा आरोपी पथकास पाहुन सदर ठिकाणावरुन पळुन जावु लागला.
पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा एक किलोमीटर फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सुरज लतीफ शेख (वय २४) वर्षे, रा. चांदा, असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार अक्षय बाळु जाधव रा. समतानगर चांदा, (फरार), सुरज कैलास उबाळे रा. शास्त्रीनगर, चांदा, (फरार) अशांनी मिळुन मयत नामे शाहिद राजमहंमद शेख यास आर्थीक व्यवहार व वादाचे कारणावरुन गावठी कट्टयामधुन फायर करुन खुन केल्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्टयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन शोध चालु आहे.

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करीत आहे. सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सपोनि/हरिष भोये, पोउपनि/दिपक मेढे, महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय पवार, गणेश लोंढे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी केली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

