सोनई – खेडले परमानंद रस्त्याची डाग – डूजी सुरू आहे परंतु ती अतिशय थातूरमातूर स्वरूपाची असल्याकारणाने अवघ्या काही दिवसातच परिस्थिती जशीच तशी होणार आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून खेडले परमानंद ते सोनई हा दहा किलोमीटरचा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झालेली असताना नुकतेच या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू आहे ,परंतु सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे.
कचकडी खड्ड्यात टाकून डांबराचा साधा शिपका दिलेला दिसून येत आहे ,अशी परिस्थिती असताना प्रशासनाचे मात्र सदर गोष्टीकडे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून रस्त्याची योग्य ती दुरुस्ती उत्तम दर्जाची करावी अशी नागरिकांची मागणी आहे .
संबंधित ठेकेदाराला योग्य ती नोटीस बजावून कामाचा दर्जा सुधारावा .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

