
नेवासा-पुनर्वसन प्रश्नासंदर्भात नेवासा येथे पार पडलेल्या विशेष शिबिरात जवळपास ५० वर्षापासूनची प्रलंबीत असलेली ३०० प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन प्रश्नांसाठी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मच्छिद्र मारले यांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर मुंबई येथे आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबत अधिकाऱ्यांनी दखल घेतली. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी नेवासा येथे याबाबत शिबीर घेण्याचे निश्चित केले.

प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले. या शिबिरात महसूल कर्मचाऱ्यांनी जागेवरच आवश्यक कागदपत्रे तयार करुन शेतकऱ्यांना सुपूर्त केली. यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
उपक्रमाबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी संपूर्ण महसूल यंत्रणेचे आभार मानले. यावेळी संदीप बेळगे, नवनाथ फासाटे, प्रभाकर मुकुटमल, उत्तम फटांगरे, गुलाब शेख, दत्तात्रेय आगळे, नाना रोकडे, दत्तात्रय निकम, महादेव आव्हाड, योगेश बाचकर तसेच भारतीय स्वाभिमानी संघाचे गणपत मोरे व रामभाऊ मगरे उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

