
नेवासा –तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे चार दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शनि दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. कमिशन एजंट व पोलिसांचा त्रास नसल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वी शनीभक्तांमध्ये लटकू, बेशिस्त वाहतूक, आर्थिक लूटमार, असुरक्षितता व पोलिसांचा त्रास यामुळे प्रचंड नाराजी होती. आता देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या खमक्या भूमिकेमुळे पंधरा दिवसापासून या त्रासातून मुक्तता झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विशेष अतिथींचे समितीचे सदस्य कार्यकारी अधिकारी अतुल. चौरमारे, सपोनी आशिष शेळके, दादासाहेब बोरुडे आदी सदस्य स्वागत करत आहेत. दरम्यान प्रशासक प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून देवस्थान प्रयत्नशील असल्याने कारभारात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाही आ. लंघे यांनी देऊन आढावा घेतला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







