घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव चांदा , बेल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अहील्यानगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक अहील्यानगर सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई चे आदेश दिले होते.

त्या नुसार पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे, पोलीस काॅस्टेबल बाळासाहेब खेडकर, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहिती नुसार घोडेगाव ते मिरी रोडवर असलेल्या भिल्ल वस्ती एका टपरी मध्ये संजय गायकवाड हा बेकायदेशीर गावठी दारू विक्री करत होता. पन्नास लिटर असलेली पाच हजार रुपये किंमतीची तयार हातभट्टीची दारू तसेच दारू तयार करण्यासाठी तिनशे लिटर तिस हजार रुपये किंमतीचे रसायन असा एकुण पस्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला.

चांदा ते कुकाणा रोडवर असलेल्या हाॅटेल सह्याद्री येथे संजय भालके हा बेकायदेशीर देशी विदेशी दारू ची विक्री करत असताना मिळुन आला. या ठिकाणाहून विविध कंपन्यांची देशी विदेशी कंपन्यांची आठराशे रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. तसेच बेल्हेकरवाडी रोडवरील येथे एका टपरी मध्ये नंदु पाडुरंग वंजारी हा देशी विदेशी कंपन्यांची बेकायदेशीर दारू विक्री करत होता.

बाराशे रुपये किंमतीची दारू या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र दारू कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

