
आपला जिल्हा – शिर्डी शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाचे सेवन करताना चार तरुणांना रंगेहाथ पकडण्यात आले. चिलीमद्वारे गांजा सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. शिर्डीमध्ये काटवनात काही तरुण गांजा सेवन करत आहेत, ही माहिती शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळताच सायंकाळी ७ वाजता पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.

यावेळी त्यावेळी विशाल अभंग करडोबानगर, शिर्डी, यश मोरे निमगाव कोऱ्हाळे हे दोघे चिलीममधून गांजा ओढताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून चिलीम व माचीस जप्त करून पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय राहाता येथे वैद्यकीय तपासणीत गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या कारवाईत रामा माळी, गणेशवाडी, शिर्डी व अनिल माळी निमगाव कोऱ्हाळे यांना देखील गांजा सेवन करताना पकडण्यात आले.

या चौघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत चारही तरुणांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गांजा कोठे खरेदी केला कोणाकडून विकत घेतला यांचा देखील तपास सुरू आहे. यामुळे गांजा विकणारे देखील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शिर्डी पोलिसांनी शहरात गांजा व इतर अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला असून जर कोठे गांजा विक्री होत असेल तर नागरिकांनी शिर्डी पोलीसांना माहिती द्यावी. त्याची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत, असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

