आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आंबेडकर

महामार्ग ठप्प; रस्त्याच्या दुतर्फा तीन – चार किलोमीटरपर्यंत लागल्या वाहणांच्या रांगा!

नेवासे,दि.२६ (प्रतिनिधी) – तेलकुडगाव (ता.नेवासे) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृतपणे काढून नेल्याच्या घटने विरोधात जिल्हाभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवार (दि.२६) रोजी दुपारी १२ वाजता नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौक ते डॉ.आंबेडकर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बचाव कृती समितीच्यावतीने सुमारे दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंबेडकर


यावेळी बोलतांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या पुतळ्याशी जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत.प्रशासनाने काही दिवसांतच पुतळा आहे त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक बसवला नाही तर लोकशाही व शांततामय मार्गाने होणाऱ्या तीव्र आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील,असा धडक
इशारा देत ते म्हणाले की,पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा अस्मितेचा प्रश्न आहे.प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर हा लढा रस्त्यापासून मंत्रालयापर्यंत नेऊ,असा इशारा त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

आंबेडकर


या आंदोलनाचे नेत्तृत्व रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे,रिपाईचे शहराध्यक्ष पप्पू इंगळे यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते प्रा.किसन चव्हाण म्हणाले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या आदेशाने व कोणाच्या परवानगीने हटवला गेला याचा खुलासा प्रशासनाच्यावतीने करण्यात यावा तसेच आमच्या शांततेचा आणि सहनशीलतेचा अंत आता पाहू नये प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे ‘त्या’ जागी पुन्हा बसवीला नाहीतर आम्ही स्वतः तेलकुडगावात येथे जाऊन महामानवाचा पुतळा बसविणार असून मंग होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा निर्वांनीचा इशाराही यावेळी बोलतांना स्पष्ट शब्दात दिला.

आंबेडकर


यावेळी अड.संजय सुखधान,आरपीआय तालुकाध्यक्ष सुशील धायजे,शहराध्यक्ष पप्पू इंगळे,वंचितचे तालुकाध्यक्ष पोपट सरोदे,दयानंद खिल्लारे,विजय गायकवाड,स्वप्निल सोनकांबळे आदी मान्यवरांची भाषणे झाली यावेळी आंदोलकांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी स्वीकारले या आंदोलनास मोठ्या संख्येने भीमसैनिक,महिला भगिनी, युवक-युवती उपस्थित होत्या.यावेळी नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार,उपनिरीक्षक विकास पाटील,सहायक फौजदार गणेश नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त करत रस्ता रोको झाल्यानंतर वाहतुकीस महामार्ग सुरुळीत केला.

आंबेडकर


निळ्या टोप्या घातलेले शेकडो रिपाईचे महिला – पुरुष आणि भीमसैनिक थेट रस्त्यावर उतरले डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे,अशा कडक आणि शब्दात त्यांनी थेट प्रशासनालाच यावेळी इशारा देवून आपला संताप व्यक्त केला.

आंबेडकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!