आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
घरफोडी
घरफोडी

नेवासा पोलिसांनी उघडकीस आणल्या तीन घरफोड्या; श्रीरामपूर आणि नाशिक जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती

नेवासा – नेवासा शहरातील उस्थळ रोड परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीला नेवासा पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. संतोष भगवान काळे (वय ४२, रा. हर्ली, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध नेवासा, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला आणि कर्नाटक राज्यातील हिरियूर येथे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी यांचे हात-पाय बांधून लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण केली आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

घरफोडी

या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ११८(२), ११५(२) आणि ३५१(२) प्रमाणे ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास पथकाने साक्षीदारांकडून मिळालेली माहिती, छायाचित्रे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. आरोपी संतोष भगवान काळे हा घटनेच्या दिवशी नेवासा येथे आला असल्याची माहिती तपासात समोर आली. पुढील तपासात तो नाशिक जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले.

घरफोडी

आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल

पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे, कोपरगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा, तसेच कर्नाटक राज्यातील हिरियूर आणि नाशिक जिल्ह्यातील येवला येथे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

नेवासा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ८२७/२०२६ मध्ये आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलीस अधीक्षक एम. सुर्दशन, अपर पोलीस अधीक्षक सोमणाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक विकास पाटील आणि नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या पथकात किरण पवार, सुमित करंजकर, नारायण डुमाळे, अतुल शेळके, परमेश्वर गहाळ, सुनील गंगावणे, गणेश जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

घरफोडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घरफोडी
घरफोडी
घरफोडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घरफोडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!