आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ज्ञानेश्वर महाविद्यालय

नेवासाफाटा (वार्ताहर): श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने कृत्रिम बुध्दीमत्ता आणि उच्च शिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ अनिल पवार, (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोल्हार ) ग्रंथालय व माहितीशास्र विभाग यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजे काय इथपासून तर तीचा उच्च शिक्षणात विविध विषयात आणि विविध स्तरावर कसा उपयोग आपण करु शकतो याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. डाॅ पवार म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्ता हा विषय शिकणे येथुन पुढे गरजेचे झाले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वर महाविद्यालय

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अरुण घनवट यांनी या विषयावर विवेचन करताना दिल्ली येथे चार दिवस या विषयावर झालेल्या जागतिक परिषदेतील घटनांबाबत माहिती दिली. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, कृत्रिम प्रज्ञा आज मानवी श्रमाची जागा घेताना आपण अनुभवत आहोत, त्यामुळे उत्पादकता वाढत आहे, शेती उत्पनात वाढ होत आहे, कंपन्यांची वाढ होत आहे ही आपण टेक्नोलाॅजीमध्ये प्रगत होत आहोत याची नांदी आहे. या आणि अशा सर्व बाबी एका अर्थाने आपल्यासाठी अर्थात भारतासाठी अभिमानाची बाब आहे. परंतू दुसर्‍या बाजुने बर्‍याच कंपन्यांनी त्यांची कामगार कपात केलेली आहे तर काही आणखी करत आहेत.

तेव्हा कृत्रिम प्रज्ञेचा वापर आपणासाठी वरदान कि शाप असा विचार निर्माण होऊ घातलेला आहे. कृत्रिम प्रज्ञेचा वापरच नव्हे तर त्यामध्ये आपण जगाला मार्गदर्शन करु शकु इतकी प्रगल्बधता आपण निर्माण करावी. परंतू कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापराने रोजगारहिन वाढ होणार नाही, तीने सामाजिक असंतोष निर्माण होईल याची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. या उलट कृत्रिम प्रज्ञेमुळे ग्रामिण भागात नवनविन सेवा, सुविधा, उद्योग आणि त्यामधुन रोजगारवाढ त्याच बरोबर उत्पादकता वाढ कशी निर्माण करता येईल याकडे प्रकर्शाने लक्ष देण्याची आवश्यकता भासणार आहे. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी सक्षम बनावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ राजेंद्र दारकुंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डाॅ सुभाष आगळे यांनी करुन दिला. प्रा अमोल जाधव यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमाची सूरूवात संत ज्ञानेश्वर माऊलींना पुष्पहार व दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यशाळेमध्ये नेवासा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर सोनई महाविद्यालय, माका महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, त्रिमुर्ती महाविद्यालयातील एकुण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. डाॅ नवनाथ आगळे, डाॅ अशोक साळवे, डाॅ राजेश वाघ, प्रा गणेश गारुळे, प्रा अरविंद शिंदे, प्रा संदिप शिरसाठ, डाॅ नुरमहंमद शेख, डाॅ दिनकर आवारे, प्रा प्रकाश वाळुंज, डाॅ बाळासाहेब जगताप, डाॅ बर्डे, डाॅ कार्तिकी नांगरे आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
ज्ञानेश्वर महाविद्यालय
ज्ञानेश्वर महाविद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर महाविद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!