नगरसेवक

नेवासा मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

नेवासा –नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा व काही नगरसेवक/नगरसेविका यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून, शासकीय मालमत्तेचे नुकसान करून व अधिकारी/कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून गंभीर गैरवर्तन केले असल्याने या सर्वांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून केली आहे.

जिल्हाधिकारी नगरपंचायतच्यावतीने यांना मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी पत्र पाठविले असून त्यात म्हटले की, उपनगराध्यक्षा व काही नगरसेवक/नगरसेविका यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

नगरसेवक

त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून गैरवर्तन केले आहे. याबाबत गु.र.नं. ००७२/२०२६ व ००८५/२०२६ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५५-अ व ४२ अंतर्गत संबंधितांवर अपात्रतेची कार्यवाही करणे आवश्यक आहे.

तरी, सदर प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात येत असून, त्यानुषंगाने आपल्या स्तरावरून सदर प्रकरणाचा अहवाल शासनास सादर करणेस विनंती आहे. करिता, संबंधित उपनगराध्यक्षा व नगरसेवक/नगरसेविका यांना अपात्र ठरविणेबाबतची शिफारस नगरपंचायत कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

नगरसेवक
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगरसेवक
नगरसेवक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!