मोहिनीराज

नेवासा-मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथे ‘पसायदान’ प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अर्पण केलेले ‘पसायदान’ हे मराठी सार्वकालिक प्रार्थनागीत मानले जाते. त्या पसायदानाची आकर्षक प्रतिमा मंदिरात स्थापित करून मराठी भाषेच्या वैभवाला अभिवादन करण्यात आले. या प्रतिमेचे अनावरण व दगडी साहित्यविश्वातील व्यासपीठावर स्थापित करण्यात आलेल्या माऊलींच्या प्रतिमेसह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थानचे सचिव जयेश बडवे व उपाध्यक्ष शंकर बडवे यांनी हभप देविदास महाराज मोहिनीराज मंदीर येथे पसायदान प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

मोहिनीराज

यांचे संतपूजन केले. धार्मिक विधींचे पौरोहित्य नारायण बडवे यांनी केले. यावेळी आदिनाथ महाराज पांगरे, दामोदर पवार आदी भाविक उपस्थित होते. या पसायदानाची प्रतिकृती शिवम रेडियमचे अंकुश शिंदे यांनी उत्कृष्ट बनवल्याबद्दल विश्वस्तांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मराठीचा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी नेवासेत लिहिला गेला, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती लक्षात घेता मराठी भाषा दिनाचा उत्सव येथे केवळ औपचारिक राहत नाही, तर तो भाषाभिमान, सांस्कृतिक स्मरण आणि आध्यात्मिक परंपरेचा जागर यांचा संगम ठरतो असे सांगण्यात आले.

मोहिनीराज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोहिनीराज
मोहिनीराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोहिनीराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!