आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मालती रामेश्वर साळुंके
मालती रामेश्वर साळुंके

नेवासे – भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी),पुणे येथील मालती रामेश्वर साळुंके यांना ‘फार्मास्युटिकल सायन्सेस’या विषयात नुकतीच विद्यापीठाने पी.एच.डी.पदवी जाहीर केली आहे. ​मालती साळुंखे यांनी “जखम भरून येण्यासाठी नाविन्यपूर्ण हर्बल फॉर्म्युलेशनचा विकास” या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला होता.

मालती रामेश्वर साळुंके

त्यांच्या या संशोधनामुळे जखमांवर प्रभावी उपचार करण्यासाठी नैसर्गिक औषधी घटकांचा वापर कशा प्रकारे करता येईल, यावर प्रकाश पडला आहे ​त्यांना पुना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवणे येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.वैभव शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.बुधवार (दि.१८) फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाने त्यांच्या निकालाची अधिकृत घोषणा केली.

​त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरू, रजिस्ट्रार,शिक्षक वर्ग आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.या पदवीमुळे फार्मसी क्षेत्रात आणि विशेषतः हर्बल मेडिसिनमध्ये संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मालती साळुंके यां भास्कर यादव साळुंके यांच्या सुनबाई आहेत त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख,भानसहिवऱ्याचे माजी सरपंच देविदास साळुंके, अशोकशेठ बोरा,पुरुषोत्तम सर्जे,डॉ.सीएम उचित डॉ. साळुंखे,डॉ.भोईट,मार्केट कमिटीचे चेअरमन नंदकुमार पाटील,माजी पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार यांनी अभिनंदन केले आहे.

मालती रामेश्वर साळुंके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मालती रामेश्वर साळुंके
मालती रामेश्वर साळुंके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मालती रामेश्वर साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!