नेवासा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्यावतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा’ अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तेराशेपेक्षा जास्त विद्यार्थी, चाळीस शिक्षक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जावळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षक ढेरे यांनी केले.

कदम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम समजावून सांगत कायद्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच पॉक्सो कायद्याची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आभार पठाण यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.