सोनई | संदीप दरंदले – नेवासा पंचायत समिती कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मधील ट्रेनी शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरु असतांना आज उपोषणार्थीची आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंञी आणि उपमुख्यमंञ्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन देवून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडविले. यावेळी नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय लखवाल,गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड,भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,शिवसेना विधानसभा प्रमुख श्री भाऊसाहेब वाघ, मनोज पारखे, राजेंद्र मुथा, श्री नवनाथ साळुंके, अजितसिंग नरुला आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.