ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
काडतुसे

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गावठी कट्यासह जिवंत काडतुसे बाळगणारा सोनई पोलीसांकडुन जेरबंद करण्यात आला. दि. २ रोजी रात्री १२.२० वाजेच्या दरम्यान घोडेगाव ते चांदा रोडवर असणाऱ्या धनगर वस्ती कडे जाणाऱ्या फाट्यावर शिवतेज शिवाजी जावळे (वय.३०) रा. चांदा हा एक पांढऱ्या रंगाची एम एच २० सि. एच १५४५ क्रमांक असलेल्या कार मध्ये जात असताना त्याचा पोलीसांना संशय आल्याने त्यास उभा केले. पोलीस असल्याचे चाहुल लागताच कारच्या खाली उतरून पळु जाऊ लागला. त्यास पाठलाग करत मोठ्या शिताफीने ताब्यात घेत असताना पोलिसांशी झटपट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

काडतुसे

त्याची व त्याच्या तालुक्यातील कारची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेला १.५०.००० स्टिल बाॅडी असलेला देशी बनावटीचा गावठी कठ्ठा,२.३५० रुपये किंमतीचे सात जिवंत काडतुसे, ३.५०.०० रुपये किंमतीची कार असा एकूण ५.५०.३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मा. जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांचे कडील शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आला. असल्याची पोलीस काॅस्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा र नं. ५०/२०२५ बिएनएस चे कलम १३२ आर्म अॅक्ट कलम ३,५,७/२५मु.पो.अॅक्ट ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.

काडतुसे
काडतुसे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काडतुसे
काडतुसे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काडतुसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!