नेवासा – सौंदाळा ता नेवासा जि अहिल्यानगर ग्रामपंचायतने ग्रामसभा ठराव प्रमाणे शिव्या बंदी व विधवा महीला सन्मान बाबतीत शासन निर्णय करून माता – भगिनीचा जागतिक महीला दिनी सन्मान करावा यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचे नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव आरगडे यांनी सांगितले. याबाबत मला मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ग्रामपंचायत सौंदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ने ग्रामसभेत शिव्या बंदी व विधवा महिला सन्मान बाबत ठराव घेऊन मंजूर केले आहेत. ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन अर्वाच भाषेत बोलून आपण अपमानित करतो.

वास्तविक भांडण झाल्यावर मोठ्याने आरडून ओरडून शिव्या देत असताना तिथे माता-भगिनींचा काही संबंध नसतो परंतु तमाम महिलांना तेथे अपमानित केली जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन कोर्टा पर्यंत हे प्रकरण जाते. त्यामुळे वेळ पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केला आहे. शिव्या देणाऱ्या व्यक्तीस ५००/- रुपये दंड आकारण्यात येतो त्यामुळे शिव्या देणे थांबले आहे.
तसेच पतीच्या निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो परंतु तिचे कुंकू पुसणे, जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही. तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते, परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते.

तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं. विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची, कुटुंब खर्चाची, वृद्ध सासू-सासर्यांच्या औषध उपचारांच्या खर्चाची जबाबदारी येते. अशावेळी तिला विधवा म्हणून समाज तिच्याकडे अबला कुंमकुवत नजरेने बघतो. काही विधवांचे अतिशय लहान मूल असतात. त्यांना बापाच्या सावलीची व तिला पतीची गरज असते. अशावेळी तिला जर पती गेल्यानंतर पुनर्विवाहस परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते. म्हणून सौंदाळा गावाने विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू टिकली सौंदर्य प्रसादानाची दाग दागिने मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाह परवानगी दिली आहे.

म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडक्या बहिणींचा शिव्या बंदी विधवा सन्मान कायदा करून त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण वरील प्रमाणे महिलांच्या सन्मानार्थ शासन निर्णय करावा या मागणीसाठी दिनांक ८ मार्च २०२५ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता महिला दिनी प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत उपोषण करणार आहे. याबाबत निर्णय लवकर घेऊन माता-भगिनींचा सन्मान आपले महाराष्ट्र शासन म्हणून आपण कराल अशी नम्र विनंती केली आहे
या निवेदनाच्या प्रती मा. ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा. जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर
मा. तहसीलदार साहेब नेवासा
मा. पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन नेवासा यांना दिल्या आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.