नेवासा – तालुक्यातील सलाबतपूर परिसरातील ग्रामीण भागातही अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीला नोटीस प्राप्त झाल्याने व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.राज्य सरकारने अतिक्रमण मुक्त राज्य हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असले तरी व्यावसायीकांनी मात्र, नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात जर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली तर अनेक कुटुंब बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यावसायीकांचे तर अवसानच गळाले आहे. दररोजच्या रोटीसाठी रस्त्याच्याकडेला छोटा-मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारांची संख्या मोठी आहे.

मुलांचे, शिक्षण, मुलींचें ‘लग्न यासाठी सुरू असलेल्या व्यवसायावर अनेकांनी कर्ज काढले आहे. मात्र, शासनाच्या धडक मोहिमेमुळे आता कर्ज कसे फेडावे व न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न सध्या
व्यावसायिकांना सतावत आहे. सध्या तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्याने तरुण मुलं हवालदिल झाले आहेत. त्यातच नोकरी नसल्याने कुणी लगासाठी विचारातही नाही. त्यामुळे दुधाची तहान ताकावर म्हणत अनेक तरुण सध्या मिळेल त्या जागेवर व्यवसाय थाट्ण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयाने युवकांच्या स्वप्नावर पाणी फिरले गेले आहे. ग्रामीण भागात व्यावसायिक बेघर होणाऱ्या कुटुंबांचे कुठल्याही प्रकारे पुनर्वसन न करता राज्यकत्यांनी हाती घेतलेल्या अतिक्रमण विरोधी धोरणावर ग्रामीण भागात संताप व्यक्त होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.