नेवासा – १ मार्च रोजी झालेल्या भव्य डे- नाईट क्रिकेट स्पर्धेत ज्ञान फाऊंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग ( पर्व२ )- २०२५ च्या शेवटच्या क्रिकेट सामन्यात चॅम्पियन्स सुपर किंगज् हा संघ विजेता ठरला आणि विघ्नहर्ता बेलपांढरी हा संघ उपविजेता ठरला. नाणेफेक जिंकून चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतांना विघ्नहर्ता बेलपांढरी या संघाने ६ षटकात ८ बाद ४२ धावांचे आव्हान चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघासमोर ठेवले. या धावांचा पाठलाग करताना चॅम्पियन्स सुपर किंगज् संघाने ४ गाड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू शेष ठेवून हा सामना जिंकला आणि चॅम्पियन्स सुपर किंगज् संघ हा ज्ञान प्रीमियर लीग २०२5 (पर्व दुसरे ) चा मानकरी ठरला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी पै.अनिकेत भाऊ घुले ( संस्थापक अध्यक्ष,शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र ) व बाबासाहेब शिंदे ( पंचगंगा उद्योग समूह) यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी पै. अनिकेत भाऊ घुले यांचा सन्मान श्री पप्पूभाऊ डौले व श्री अजित मारकळी व श्री बाबासाहेब शिंदे यांचा सन्मान श्री सागरजी गंधारे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सामन्यात संकेत शिंदे या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला तसेच या स्पर्धेत अनेक बक्षिसे देण्यात आली त्यातील मॅन ऑफ द सिरीज हा किताब अक्षय जऱ्हाड यांना पै.अनिकेत भाऊ घुले व बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला तसेच उत्कृष्ट फलंदाज- सूरज भगत ,उत्कृष्ट गोलंदाज- पंकज आरंगळे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण- अशोक कुदळे व उत्कृष्ट यष्टीरक्षक- मेजर पांडुरंग गजे तसेच नवोदित गोलंदाज, नवोदित फलंदाज व नवोदित क्षेत्ररक्षक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील क्रिडाक्षेत्रातुन विशेष कामगिरी केल्याबद्दल महेश निकम, अभिजीत हुसळे व सोमनाथ अहिरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व संघमालकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
तसेच उपस्थित मान्यवरच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यातील पहिले पारितोषिक १ लाख रुपये हे पंचगंगा उद्योग समुहाचे श्री प्रभाकरजी शिंदे यांच्या हस्ते चॅम्पियन्स सुपर किंगज् नेवासा या संघाला देण्यात आले, दुसरे पारितोषिक ७१ हजार रुपये हे विघ्नहर्ता बेलपांढरी या संघाला दीपक शेठ अकोलकर व किशोरजी भणगे यांच्या हस्ते देण्यात आले, तृतीय पारितोषिक 51 हजार रुपये हे फ्रेंड्स क्रिकेट क्लब -मक्तापूर या संघाला विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा चे मालक कमलेश ओस्तवाल यांच्या हस्ते देण्यात आले,चतुर्थ पारितोषिक ३५ हजार रुपये छत्रपती शिवाजी किंगज ब्लास्टर या संघाला संतोष मामा निपुंगे यांच्या हस्ते देण्यात आले, पाचवे प्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये हे मक्तापुर ब्लास्टर या संघाला श्री ॲड. संजयजी सुखदान यांच्या हस्ते देण्यात आले तसेच सहाव्या प्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये हे श्री आर्यन्स या संघाला श्री. ॲड. जावेदभाई इनामदार यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले ते किसान ॲग्रोटेक, जगदंबा इलेक्ट्रॉनिक,ई-हापसे बाईक, साई सायकल मार्ट,जगदंब स्पोर्टस् व टी शर्ट प्रिंट, आशा भेळ,जी. ए. विखोना ,आत्मदिप हॉस्पिटल,कालविश्व कन्स्ट्रक्शन, हॉटेल काळे बंधु,ओमकार हार्डवेअर,बी. आर. ॲग्रो,एकता सायकल मार्ट,वारसा पैठणी, हॉटेल सनी पॅलेस,नळकांडे बुक डेपो,शक्तीमान रोटर्स,राम राज्य उत्सव समिती,एकता प्रतिष्ठान,नेवासा प्रेस क्लब,हॉटेल इनामदार,सुयोग बिल्डर्स,शिवतीर्थ कन्स्ट्रक्शन व जिओ फायबर.
या पारितोषिक सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात मारुतीराव घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील,धनुभाऊ काळे,राजेंद्र काळे, आश्विन भाऊ लोंढे,श्रीकांत लालगुडे, विठ्ठलअण्णा शेळके, प्रजुल ढाकोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार,ॲड गणेश निमसे, तान्हाजी गायकवाड, नरेंद्र कदम, विठ्ठल काळे,ऋषिकेश हापसे, रितेश भाऊ कराळे,ओमकार कुटे, ॲड. मनोज साखरे,रोहित नळकांडे,इंजि. श्यामजी डोकडे, सतीश गायके,

रामराज्य उत्सव समितीचे सदस्य,विशाल भाऊ जायगुडे,किशोर गायकवाड,डॉ.मनोजकुमार शिंदे,अभय शेठ गुगळे, नितीन खंडाळे, वैभव नहार, पत्रकार रमेश शिंदे ,सतीश पिंपळे, ॲड. सुदाम ठुबे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्ञान फाउंडेशन चे मार्गदर्शक व उत्कृष्ट डिझायनर सागर गंधारे,प्रा. देविदास साळुंके सर ,अध्यक्ष आदित्य खंडाळे, संदीप वीर , अनिल अरगडे, विजय गायकवाड, समीर घुले,महेश देवढे,ॲड. प्रदीप पाठे, हरिभाऊ शेजुळ,निलेश खंडाळे यांनी अथक परिश्रम करुन ही स्पर्धा पार पाडली ज्ञान फाउंडेशनला विशेष सहकार्य लाभलेले ते पसायदान स्पोर्ट्स क्लबचे सदस्य पांडुरंग गजे,अशोक कुदळे ,समीर शहा,चंद्रकांत पंडित,किशोर पठाडे,डॉ. कुसळकर, नितीन बोरुडे, आदित्य बनसोडे,आकाश नवघरे, दिनेश विखोना, गॅट साहेब,अंबादास गीते, मंगेश पाटील, प्रकाश शेजुळ, राहुल शिंदे, प्रशांत डाके, अनिकेत सुतार,सागर घोलप, संजय माने, पत्रकार मित्र व सर्व बक्षीसदाते यांचे आभार फाउंडेशन चे सदस्य ॲड. प्रशांत पाठे यांनी मानले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.देवीदास साळुंके यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.