नेवासा- शहरातील वीजेची समस्या कायमस्वरूपी संपावी व शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी शहराला स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मनोज पारखे यांनी अहिल्यानगर जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष रितेश कराळे व करण पोटफोडे उपस्थित होते.
महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री रविंद्र पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेवासा शहरामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने वीजेची मागणी वाढली आहे

याबरोबरच शहरालगत दक्षिण पश्चिम बाजुस ५ किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्रावर शेती असल्याने शहरातील शेती फिडर ओव्हरलोड होत असतात यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा मिळत नाही नेवासा शहरातील उपनगरे व फाटा परिसरातही अनेकदा वीजेचा तुटवडा भासत असतो ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नेवासा शहराचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र असणे गरजेचे आहे तरी महावितरणने या मागणीचा गांभीर्याने विचार करून नेवासा शहरासाठी स्वतंत्र १० एमव्हीए क्षमतेचे रोहीत्र असलेले विद्युत उपकेंद्र उभारावे ही मागणी पारखे यांनी केली या मागणीला अधिक्षक अभियंता श्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करत तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.