नेवासा –शासकीय योजनेतून मंजूर झालेली घरकुले भूमिहीन लाभार्थीना ग्रामपंचायतच्या रिकाम्या जागेत बांधण्यास परवानगी द्यावी व ग्रामपंचायत जागेतील अतिक्रमणे नियमानुकुल करावीत या मागणीसाठी चिलेखनवाडी ग्रामस्थ पंचायत समिती आवारात उद्या गुरुवार दि. ६ मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी दिली.चिलेखनवाडी येथे अनेक लाभार्थीना.. घरकुले. मंजूर झाली आहेत. पंधरा हजार रुपये पहिला हप्ताही लाभार्थीच्या खात्यावर जमा झाला आहे; परंतु भूमिहीन व बेघर लाभार्थी जागेअभावी सदर योजनेचालाभ घेऊ शकत नाहीत.

सध्या महसुली नोंदी प्रमाणे ग्रामपंचायत भोगवटादार असलेले गट नं १७७क्षेत्र १.१७ आर व गट नं १७८ क्षेत्र ०.९१ आर या जागेवर घरकुल बांधकामास परवानगी द्यावी, असा ठराव चिलेखनवाडी ग्रामपंचायतने संमत केला आहे. या जागेवर आजपर्यंत अनेक लाभार्थीनी इंदिरा आवास, रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतून अनेक घरांचे बांधकाम केले आहे. परंतु पंचायत समिती स्तरांवरून सदर जागेवर भूमिहीन लाभार्थीना बांधकाम करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या जागेवर ग्रामस्थांनी यापूर्वी बांधलेल्या घरांचे अतिक्रमण नियमानुकुल करावे. नवीन घरकुल बांधणीस परवानगी द्यावी या मागणीसाठी गुरुवार ६ मार्चपासून पंचायत समिती आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

यासंबंधीचे निवेदन पंचायत समिती, पोलीस निरीक्षक, तहसिलदार, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनावर उपसरपंच नाथा गुंजाळ, सुहास गायकवाड, चंद्रकांत पाडळे, भाऊसाहेब रा. सावंत, रामदास कांबळे, सुशिल कांबळे, रवि कांबळे, रमेश सावंत, सुमंत कांबळे, मधुकर काटे, शेषराव भातंबरे, देविदास सावंत, पांडूरंग मुरकुटे, अप्पासाहेब सावंत, छबू आहेर, किरण कांबळे व घरकुल लाभार्थीच्या सह्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.