आरोपींना फाशीची शिक्षा द्या: मुकिंदपुरचे सरपंच सतीश दादा निपुंगे यांची मागणी.
नेवासा – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूर आणि अमानवीय पद्धतीने करण्यात आली असून काळजालाही बांध फुटावा अशी ही घटना असून त्याचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक 7 मार्च शुक्रवार रोजी नेवासा फाटा (मुकिंदपुर )बंदचे आवाहन आज सरपंच सतीश दादा निपुंगे यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी अतिरेकीसुद्धा इतक्या क्रूर आणि निर्दयीपणे एखाद्या व्यक्तीला मारत नाहीत ,इतक्या भयानक पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही एक आरोपी प्रशासनाला सापडत नाही, याचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करतो, तसेच सर्व आरोपींचा खटला जलदगती कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरपंच सतीश दादा निपुंगे यांनी यावेळी केली.याप्रसंगी उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचेसहित पप्पू कुटे, सतीश निपुंगे, पप्पू हांडे आदी मंडळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.