गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई केली.या बाबत दि. ६ रोजी गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे( वय.४४) रा. चांदा हा गावातच असलेल्या माळगल्ली मध्ये बेकायदेशीर रित्या गावठी दारू विक्री करताना मिळुन आला. त्याचे कडून ५००० रुपये किंमतीची तयार दारू जप्त करण्यात आली.पो.ना.सोमनाथ झांबरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ५५/२०२५ महा. दा. ६५(इ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई ही घोडेगाव येथील सुधाकर मारुती कुऱ्हाडे (वय.५६) हा आपल्या राहत्या घरात तयार गावठी दारू व त्यासाठी लागणारे रसायन विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आला. त्याचेकडे १५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरी कारवाई पोपट उत्तर जावळे (वय.३६) रा. चांदा याचे मोरगव्हाण शिवारात असलेल्या हाॅटेल गारवा मध्ये १५०० रुपये किंमतीची देशी विदेशी कंपन्यांची बेकायदा दारू ची विक्री करताना आढळुन आला. चौथी कारवाई खेडले परमानंद येथील बाबासाहेब कचरु भोसले( वय. ४७) हा सोनई गावात अपना चिकन शाॅप मध्ये कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना तसेच खेळविताना मिळुन आला. त्याचे कडुन १०२० रोख रक्कम व खेळाचे साहित्य जप्त करण्यात आले. पाचवी कारवाई खेडले परमानंद येथील खंडेराव जयवंत गरुड (वय.३८) हा सोनई गावात एका टपरी मध्ये विना परवाना कल्याण मटका खेळताना व खेळविताना मिळुन आला.

११२० रुपये रोख रक्कम व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सहावी कारवाई ही सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकात एका टपरी मध्ये नितीन सूर्यभान वैरागी (वय.४२) हा देखील कल्याण मटका खेळताना व खेळविताना मिळुन आला रोख रक्कम १२४० व खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सर्व आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, यांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली केली .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.