पाचेगाव – ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येतो.त्याच पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ग्रामसभेत गावाचे सरपंच सुदर्शन वाकचौरे यांनी दारू बंदीचा ठराव घेऊन तो ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.त्यामुळे गावातील महिला दिनाच्या निमित्ताने या दारू बंदीच्या ठरावाचे महिलांनी स्वागत करून ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत अंतर्गत महिलासाठी रांगोळी स्पर्धा, संगित खुर्ची ठेऊन त्यांसाठी बक्षीस ठेवण्यात आले होते.गावामध्ये महिलासाठी आरोग्य शबीर घेण्यात आले. त्यामध्ये जवळपास २९ महिलांचे आरोग्य नेवासा बु येथील प्राथमिक आरोग्याच्या माध्यमातून तपासण्यात आले.

गावामध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी कॅप भरविण्यात आला होता.त्यात ४२ महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले.दारू विषयी सौ सुनिता अनिल बर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात दारू बंदी झाली तर गाव मधील तरुण वर्ग व्यसनमुक्ती होतील.महिलांना संसारात पुरुषांचा हातभार लागेल. तसेच सौ संजवनी रविद्र गायवाड, सौ सुरेखा अनिल गंधारे यांनी देखील महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. जागतीक महिला दिना निमित्ताने नवीन घरकुल गृह प्रवेश व घरकुलांचे उद्घाटन देखील करण्यात आले.

या वेळी महिला बचत गटाची मोठ्या प्रमाणात उपस्थीत होती.या महिलादिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अलका तागड, वैशाली वाकचौरे, शारदा काळे, सुवर्णा जाधव, सविता दारकुंडे, कविता सोनपुरे, रजनी शिंदे, मुमताज शेख,रजिया पठाण, संगिता विंचे, पुजा गंधारे, सोनाली गांगुर्डे,उज्वला बर्डे, सुवर्णा कातोरे, उषा बर्डे, विजया वाघमारे,परीवन इनामदार, मुक्ता बर्डे,रोहणी गंधारे, आयशा शेख,अमिना ईनामदार,वंदाना सकट यांच्या सह ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सतीश मोटे,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.