नेवासा – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा व परिसरातील महिलांसाठी नेवासा येथे हिरकणी महिला क्लबची स्थापना करण्यात आली.नेवासा येथील हॉटेल प्रणाम च्या सभागृहात हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.हिरकणी महिला क्लबच्या संस्थापिका सौ. अर्चना फिरोदिया व सौ.नंदिनी सोनवणे यांनी या निमित्ताने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिरकणी महिला क्लब हा महिलांसाठी एक व्यासपीठ असून या क्लबच्या माध्यमातून वर्षभर येणाऱ्या सण उत्सवात सर्व महिलांना एकत्रित करून आपल्या भारतीय संस्कृती व सण वाराचे महत्व याविषयी तज्ञ महिला व्याख्यात्यांना निमंत्रित करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपण करणार असून महिलांच्या उत्कर्षासाठी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती हिरकणी महिला क्लबच्या संस्थापिका सौ. अर्चना फिरोदिया यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी सौ.अर्चना फिरोदिया यांच्या मातोश्री समाज सेविका सौ.आशा पटवा,सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुरेखाताई बल्लाळ,सौ.चंचल भाभी विखोना सौ.लताताई ढवळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येऊन महिला दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डॉ.चेतना जिंदानी यांचे” महिलांनी आत्मनिर्भर कसे बनावे”या विषयावर व्याख्यान झाले.यावेळी उपस्थित महिलांनी केलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांनी प्रबोधन केले.सौ.नंदिनी सोनवणे यांनी देखील महिलांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सुमारे ९० महिलांनी सहभाग नोंदवून हिरकणी महिला क्लबच्या सदस्यत्वाची नोंद ही केली.उपस्थित महिलांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.हिरकणी महिला क्लबच्या सौ.आरती उपाध्ये यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.