ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
नामदार चषक
नामदार चषक

सोनई – युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब,उदयन गडाख युवा मंच व यश ग्रुप सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा कारखाना सोनई येथे सोम दि 10 मार्च 2025 रोजी महंत आवेराज महाराज,अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख यांच्या हस्ते व मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत
संपन्न झाले.

या स्पर्धेत नेवासा तालुक्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे विशेष म्हणजे प्रत्येक संघातील खेळाडूंची बोली लावून खरेदी करण्यात आली. स्पर्धेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना महंत आवेराज महाराज म्हणाले उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेली नामदार चषक क्रिकेट स्पर्धेमुळे अनेक राज्यस्तरीय व देशपातळीवर खेळणारे खेळाडू तयार होणार आहेत या स्पर्धेमुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला वाव मिळतो.

नामदार चषक

सोनई व परीसरातील तरुण एकत्र येऊन युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करतात ही अभिमानास्पद बाब आहे. ही स्पर्धा सर्वानी एकत्रितपणे यशस्वी करावे असे सुनीलराव गडाख म्हणाले.
वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याबद्दल उदयन गडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले दरवर्षी नामदार चषक स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे उदयन गडाख म्हणाले.

नामदार चषक

याप्रसंगी कांगोणी व सोनई संघामध्ये प्रारंभाचा सामना खेळण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब तुवर, माजी प स सदस्य अजित मुरकुटे,सुधाकर पवार,महेश निकम,उदय पालवे अशोकराव येळवंडे,रणजित जाधव,संजय गर्जे,दादासाहेब वैरागर,उपसरपंच भिमाशंकर वरखडे,नितीन लहिरे, योगेश शिंदे,महेश काळे आदीसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नामदार चषक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नामदार चषक
नामदार चषक
नामदार चषक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नामदार चषक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!