गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव सह वडाळ्यामध्ये सध्या बिंगो नावाच्या राक्षस रुपी खेळाने थैमान घातलेले आहे. महा मार्गावरील ही दोन ही गावे व्यवसायाची केंद्र बिंदु आहेत. घोडेगाव मध्ये जनावरांचा बाजार, कांदा मार्केट, वडाळा भाजीपाला मार्केट तसा परिसर मध्यवर्ती असल्याने मोठ मोठे व्यवहार या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे आर्थिक चलन देखील मोठे असते त्यामुळे बिंगो सारख्या राक्षसाचे या ठिकाणी फावले जाते. अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमांनी या सुरू असलेल्या राक्षस रूपी बिंगो बाबत माहिती समोर मांडली परंतु त्यांचे व बुकींचे लागेबांधे असल्याने काही एक होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

परंतु याचा फटका मात्र गोरगरिबांना बसत आहे. कित्येक कुटुंब तर अहोरात्र काबाडकष्ट करत असते दिवसभरात कमावलेला पैसा या बिंगो पायी पाण्यात जातो. पर्यायाने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. या मध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग दिवसेंदिवस गुरफटून बरबाद होतांना दिसत आहे. या सर्व गोष्टींचा महा वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तरी या कडे स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेने गांभीर्याने लक्ष देवून ही गरिब कुटुंब उजाड होण्यापासून वाजवावी अशी मागणी परिसरात होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.