नेवासा – नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड येथे मंगळवारी दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ८.४५ वाजता वारकऱ्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील गाजत असलेला छावा हा चित्रपट हा दाखविण्यात येणार असल्याचे देवगड संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. देवगड येथील श्री गुरूदेव दत्त पिठाचे निर्माते श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सहा दिवशीय पुण्यतिथी सोहळयाला गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि.२२ मार्च रोजी प्रारंभ होत असून या दिवशी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत शेकडो दिंड्या हया देवगड नगरीत दाखल होत आहे.

गुरुवारी दि.२७ मार्च पर्यंत चालणाऱ्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने सकाळी व दुपारच्या सत्रात युवा कीर्तनकार गायनाचार्य हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची चरित्र कथा येथे होत आहे.रात्रीच्या होणाऱ्या किर्तन महोत्सवात ही नामवंत किर्तनकारांची कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
या पुण्यतिथी सोहळयामध्ये सद्या गाजत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट हा उपस्थित हजारो वारकऱ्यांना ही पहाता यावा यासाठी देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्यासह संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात येणाऱ्या दोन डिजिटल क्रिन पडद्यावर छावा हा चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उपस्थित हजारो वारकऱ्यांना हा चित्रपट मोफत पहाता यावा यासाठी देवगड मंदिरासमोरील प्रांगण सुसज्ज करण्यात आले आहे.धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे बलिदान व त्यांचे जीवनचरित्र यांचा समावेश असलेल्या छावा चित्रपटाने प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत पेटवत राहिली पाहिजे या उद्देशाने हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याने मंगळवारी दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ८.४५ वाजता हा चित्रपट पहाण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड गुरूदेव दत्त पीठ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.