ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बाबासाहेब आंबेडकर

नेवासा फाटा – 134व्या जयंती दिनाच्या निमित्ताने घटनापती प्रतिष्ठाणच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती नेवासा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेवासा फाटा येथील घटनापती सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ भालेराव यांच्या संकल्पनेतून आंबेडकर चौकातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुकींदपूरचे सरपंच सतिषदादा निपुंगे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे तसेच दत्ता काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

बाबासाहेब आंबेडकर

यावेळी दत्ता काळे, अमोल पठाडे, विकी कांबळे, निखिल चंदानी, पप्पू सोनकांबळे, जयदेव जमधडे, संदीप साळवे, शिवा साठे, कपिल बांगर, इरफान शेख, सचिन क्षीरसागर, तुषार बोरुडे, रवी शेरे, उमेश इंगळे, प्रतीक वाल्हेकर, साहिल शेख, विजय कांबळे, आकाश ठोकळ, सिमोन दौंडे, विक्रम साठे, महेश साठे, विकी साळवे, प्रथमेश साठे, सुरज साठे, प्रतीक कांबळे, शरद साठे, पप्पू साळवे, वक्रतुंड, विश्वास साळवे, समाधान सोनकांबळे, प्रणव साठे, अमोल शिरसाट, सनी साठे, सागर साठे, आदेश कांबळे, देविदास मगर ‎आदेश कांबळे, देविदास मगर, अमोल घुले आदींसह आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सर्वत्र निळे झेंडे लावण्यात आलेले असल्याने भीममय वातावरण निर्मिती झाल्याचे दिसून आले. आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

बाबासाहेब आंबेडकर


16 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक –
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनापती सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मुकिंदपूर (काळेगाव) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन केल्यानंतर भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी तालुक्यातील आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे दत्ता काळे यांनी केले आहे.

newasa news online
बाबासाहेब आंबेडकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!