नेवासा | सचिन कुरुंद – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट QR कोड, माध्यमातून झालेला करोडो रुपयाचा घोटाळाप्रकरणी ठोस कारवाई करण्यात यावी यासाठी आजपासून शनिशिंगणापूर काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसापासून शनिशिंगणापूर देवस्थान हे ॲप घोटाळ्याने हादरले आहे येथील काही कर्मचारी, पुजारी,यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी बनावट ऍप तयार करून, बनावट QR कोडच्या माध्यमातून, बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून देवस्थानला मिळणाऱ्या देणगीचा मोठा अपहार केला. शनिभक्तांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून प्राप्त देवस्थानचा निधी खाजगी खात्यावर वळून घेतला यामुळे देवस्थानचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच शनिभक्तांची देखील मोठी फसवणूक झाली.

याविरोधात काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी रीतसर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक, तसेच धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. घोटाळे बहाद्दरावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु समाधानकारक ठोस कारवाई न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी शनिशिंगणापूर आवारात आमरण उपोषण आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी माळवदे यांनी देवस्थानने तक्रार केलेल्या तीन बनावट ऍप व्यतिरिक्त इतर सात ते आठ ऍपची चौकशी होणे गरजेचे आहे, बनावट पावती पुस्तकाद्वारे,बनावट QR कोडद्वारे केलेल्या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली, तसेच देवस्थानने दिलेल्या ऍपच्या परवानगीविषयीं चौकशीची मागणी केली.

तसेच येथील कर्मचाऱ्यांची बँक ट्रांजाक्शनची चौकशीची मागणी केली. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित होऊन वरिष्ठ पातळीवर चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा माळवदे यांनी घेतला आहे.या आंदोलनात काँग्रेसचे संदीप मोटे, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, संजय वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे शेषराव गव्हाणे, भाजपचे दादा घायाळ, संजय होडगर, कानिफ जगताप, शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे, हरीश चक्रनारायण, सतीश तऱ्हाळ, विजय गायकवाड, गणपत मोरे आदीसह शनिभक्त उपस्थित होते.
शिंगणापूर देवस्थान हे आता शासनाच्या ताब्यात देण्याची वेळ आली असून दिवसेदिवस घोटाळे मालिका वाढत चालली आहे. ऍप घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन घोटाळे बहाद्दरावर कठोर कारवाई होऊन अपहार झालेला निधी परत देवस्थान तिजोरीत जमा होणे गरजेचे आहे.यासाठी ठोस कारवाई झालीच पाहिजे
– संभाजी माळवदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.