गडाख

नेवासा (ता. ९ नोव्हेंबर २०२५) — येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मा. आ. शंकरराव गडाख (मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्वाची घोषणा केली.

या बैठकीत आमदार गडाख यांनी स्पष्ट केले की, आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या तर्फे लढविण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, “आपली ही लढाई ही कोणत्याही व्यक्ती वा पक्षाविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”

क्रांतीकारी शेतकरी पक्ष

गडाख यांनी पुढे सांगितले की, सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व शिस्तबद्धपणे काम करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. उद्या, दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, आजच्या बैठकीत कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत नव्या जोमाने आणि विकासाच्या हेतूने उतरल्याचे आमदार गडाख यांनी यावेळी स्पष्ट केले.

क्रांतीकारी शेतकरी पक्ष
क्रांतीकारी शेतकरी पक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रांतीकारी शेतकरी पक्ष
क्रांतीकारी शेतकरी पक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रांतीकारी शेतकरी पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *