घोडेगाव – देवस्थानचा कारभार, शनि भक्ताना लटकूंचा होणारा त्रास यामुळे संपूर्ण भारतात गावचे नाव खराब झाले आहे. गेल्या अनेक वर्षात विश्वस्त, पोलीस, राजकीय नेते यांनी वेग वेगळ्या कारणाने यावर भूमिका न घेतल्याने लटकूंचे प्रमाण वाढले होते. इतिहासात पहिल्यांदा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी ठोस भूमिका घेतल्याने देशातून येणाऱ्या शनी भक्ताना मोकळा श्वास घेता येणार असे बोलले जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून भाविकांना कमिशन एजंटचा त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडिया, वर्तमानपत्र याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या काही वर्षापूर्वी राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्यांच्या स्वीय सहायकला अरे रावी केली गेली. अनेक विश्वस्त , पोलिस अधिकारी आले गेले पण निर्णय झाला नाही.

विभागीय आयुक्त डॉ गेडाम यांनी कारभार स्वीकारताच ८ च दिवसात यावर उपाय योजना चालू केल्या. त्यांनी सामान्य भाविकांना कसा त्रास होतो याचा फिरून अनुभव घेतला. त्याच दिवशी शनिवारी (२७ डिसेंबर) रोजी दुपारी जनसंपर्क कार्यालयात खाजगी वाहनतळ मालक तसेच दुकानदार यांची बैठक घेतली. भाविकांना त्रास होऊ देऊ नका, दर फलक लावा अशा सूचना केल्या .

रविवारी (दी २८ डिसेंबर) रोजी सर्कल विनायक गोरे तलहाटी सतीश पवार यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लगेच दुकानदाराची बैठक घेतली व आज रात्री पर्यंत मोठे दर फलक लावण्याच्या सूचना केल्या. सर्व कर्मचाऱ्यांनी शेगाव चे मंदिर पाहून या शिर्डीचे कामकाज कसे चालते हेही पाहून या असे आदेश त्यांनी विभाग प्रमुखांना दिले असून येणाऱ्या शनी भक्तांशी आदराने बोला त्याना समाधान वाटेल असे काम असेही त्यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

