
सोनई – दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पती-पत्नीला लोखंडी वस्तू आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायत चौकात ३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी ज्ञानेश्वर रामभाऊ कांत (वय २८) हे पत्नीसोबत असताना, आरोपी किरण राघू ससाणे याने त्यांना अडवले. आरोपीने दारू पिण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिला असता, संतापलेल्या आरोपीने ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करत लोखंडी हत्यारासारख्या वस्तूने आणि बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नी संगीता कांत यांनाही आरोपीने सोडले नाही. त्यांनाही बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी किरण ससाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







