
नेवासा : सुरेगाव (गंगा) येथील ग्रामपंचायतीवर दलित समाजाशी भेदभाव होत असल्याचा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर साठे यांनी उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणारे साठे यांनी आता गावातील आर. सी.सी. पाईप गटाराच्या काम वरही आक्षेप घेतले आहेत.
साठे यांच्या मते, मोजे सुरेगाव (गंगा) येथील आर.सी.सी. पाईप गटाराच्या कामात पारदर्शकता दिसत नाही. विशेषतः कामाच्या फलकावर कार्यारंभ आदेश, काम सुरू व पूर्ण झाल्याच्या तारखा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ही माहिती जाणीवपूर्वक लपवली जात आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. फलकावरील माहितीनुसार, हे काम जिल्हा परिषद अहमदनगरच्या जि.प. पाणी पुखठा विभाग (उत्तर) यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत सुरेगाव (गंगा), ता. नेवासा येथे करण्यात येत आहे. कामाचे नाव मोजे सुरेगाव (गंगा) येथील आर.सी.सी. पाईप गटार करणे असे आहे. हे काम अनुसूचित जाती नववध्द घटक मुलभूत सुविधा पुरविणे (सन २०२२२३) या लेखाशीर्षांतर्गत मंजूर झाले आहे.
या कामासाठी अंदाजपत्रीय रक्कम ८ लाख रुपये अन निविदा रक्कम ६,७७,६११ रुपये असल्याची नोंद आहे. ठेकेदार म्हणून जिल्हा परीषद अहमदनगर जि. प. पाणी पुरवठा विभाग (उत्तर) आहमदनगर ग्रामपंचायत सुरेगाव (गंगा) ता. नेवासा जि. अ. नगर कामाचे नावः मौजे सुरेगाव (गंगा) येथील आर. सी सी पाईप मटार करणे. लेखाशीर्ष अन्नुसुधित आती नौबध्द घटक मुलभुत सुविधा पुरविणे पुनतगाव (ता. नेवासा) येथील श्री. अक्षय काळे यांचे नाव फलकावर नमूद आहे.
मात्र साठे यांचा आरोप आहे की, काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि दर्जा तपासणीची कोणतीही स्पष्ट माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही. अनुसूचित जाती घटकांसाठी मंजूर निधीचा योग्य वापर झाला का, याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. गावकऱ्यांमध्येही या विषयावर चर्चा सुरू असून, संबंधित विभागाने आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाची भूमिका समोर आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
जर हे काम अनुसूचित जातींसाठीच्या योजनेतून झाले असेल, तर त्या समाजाच्या प्रतिनिधींना माहिती देणे आणि कामाची गुणवत्ता सुधारणा करणे आवश्यक आहे. – ज्ञानेश्वर साठे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








