
नेवासा – सिकंदर मुलाणी यांनी डेअरी टेक्नॉलॉजी ही पदवी 1997 यावर्षी प्राप्त केली आहे. इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोन आणि डेअरी टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे यांचे अजीवन सदस्य आहेत. आयडीडी केल्यानंतर डेअरी सुपरवायझर या पदापासून काम सुरु केले आहे व आज रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आहेत.

हेरिटेज फुड्स लिमिटेड, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट फलटण. मदर डेअरी मुंबई, फूड्स अँड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, अशा विविध कंपन्यांच्या पदावर काम केले आहे. व इंदुजा महिला मिल्क प्रोडूसर कंपनी लिमिटेड यवतमाळ, येथे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

29 वर्षापासून काम करत असलेल्या प्रदीर्घ अशा डेअरी व्यवसायात राष्ट्रीय गोकुळ मिशन, अंतर्गत सात हजार मोफत गाई म्हशी सभासदांना वाटप, घरगुती वापरासाठी एक हजार बायोगँस दुध ऊत्पादकांना देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे
इंदुजा डेअरी सभासदांना चांगल्या गुणवत्तेचा मुरघास कमी दराने ऊपलब्ध करून देणे, इंदुजा डेअरीच्या सभासदांसाठी ५५० गावामध्ये वर्षभर दुध विक्रीसाठी शाश्वत मार्केट निर्माण करुन देणे, अशा आपल्या कामाच्या प्रती असलेली समर्पण भावना, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठता, व चिकाटीने काम करण्याच्या अंगीकृत गुणाने उच्च पदावर कार्य त्यांनी केले आहे.

डेअरी उद्योगात काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांसाठी ही भूषणा बाब आहे. या अमूल्य सेवेचा सन्मान म्हणून रविवार दिनांक 21/12/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थित गोडवा डेअरी एक्स्पो 2025 महालक्ष्मी लॉन्स कर्वे नगर पुणे-52 येथे यंदाचा महा डेअरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हे सन्मानपत्र मा.श्री गोपाळराव म्हस्के (अध्यक्ष दूध उत्पादक प्रक्रिया व्यवसाय कल्याणकारी संघ पुणे.) मा.श्री विष्णू काका हिंगे (जेष्ठ संचालक पुणे सहकारी दूध उत्पादक संघ पुणे) मा.श्री.प्रकाश कुतवळ (चेअरमन कुतवळ फूड्स प्रा.लि.) या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

