नेवासा – शहरातील नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित बाल आनंद मेळाव्याला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध खाद्य पदार्थांचे अनेक स्टॉल उभारून विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील हे होते, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण,स्वप्नील मगर,हंडीनिमगावचे माजी सरपंच अण्णासाहेब जावळे, नगरसेवक असिफभाई पठाण, नगरसेवक मुक्तार शेख, राजेंद्र परदेशी, उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हारुणभाई जहागिरदार, पालक गोरक्षनाथ डोहाळे, प्रशांत खंडागळे सर, संदेश ठोळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असिफ शेख सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. शिक्षक साईनाथ वडते, अण्णासाहेब शिंदे, शिक्षिका सौ.सुनीता राऊत-कर्जुले, कामिनी बायस, श्रीमती संध्याताई लोंढे, विद्या खामकर, ज्योती गाडेकर, अर्चना बोकारे, मिनाक्षी लोळगे, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी झालेल्या बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन नगराध्यक्ष करणसिंह घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.बालगोपाळांच्या भरलेल्या बाल आनंद मेळाव्यात सुमारे ७० स्टॉल लावण्यात आले होते. विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची तसेच भाजीपाल्याची विक्री विद्यार्थ्यांनी केली.पाच रुपयांपासून वीस रुपये असे दर ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांकडून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद पालकांनी घेतला.

या बाल आनंद मेळाव्याच्या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन बालकांचे कौतुक केले.तर आलेल्या पालकांनी बालकांकडून भाजीपाला खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. या बाल आनंद मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक व शिक्षिकाही विद्यार्थ्यांसह सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे या कार्यक्रमाला अधिकच बहर आला होता.शिक्षिका सुनीता कर्जुले-राऊत यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

