नेवासा – तालुक्यातील वरखेड येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे कार्यस्थळावर दोन काट्यांमध्ये वेगवेगळे वजन भरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारखान्याने केलेली काटा मारी आहे असा आरोप करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर आंदोलन केले आत्तापर्यंत झालेल्या उसाच्या गाळपाचे वजनाचा दहा टक्के फरक प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे नेते ऋषिकेश शेटे यांनी केली आहे.

तालुक्याचे वरखेड या गावच्या शिवारामध्ये गेले दोन वर्षापासून स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो लिमिटेड माळेवाडी या कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम आहे या ठिकाणी तीन आणि आऊट असे दोन वजन काटे आहेत आज सकाळी एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर प्रथम च्या आउट च्या काटावर गेला त्या ठिकाणी वजन केल्यानंतर पुन्हा प्रथेप्रमाणे यांच्या काट्यावर वजन केले असता ते कमी भरले आणि हळूहळू उपस्थित सर्व शेतकऱ्यांना हे समजले त्यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांना फोन केला शेटे यांनी प्रथम कारखाना बंद करायचा आग्रह धरला त्यानंतर उभ्या असलेल्या तीन वाहनांची दोन्ही काटे वजन घेतले असता सुमारे दोन ते दीड टन वजनाचा फरक पडला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले.

त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले कारखान्याचे मॅनेजर गाडे यांना जाब विचारला ऋषिकेश शेटे यांनी तहसीलदार कलेक्टर पोलीस निरीक्षक या सर्वांना संपर्क साधला व झालेला प्रकार थेट सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित केला त्यामुळे परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने जमले या ठिकाणी भाजपाचे कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे व सचिन काळे यांनी देखील कारखान्याकडे धाव घेतली आणि त्यांनी देखील प्रशासनाला धारेवर झाली दरम्यान सायंकाळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देखील कारखाना कार्यस्थळावर धाव घेऊन त्या ठिकाणी आलेल्या पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि उपजिल्हाधिकारी रमेश दराडे साहेब यांच्याशी चर्चा केली दोन्हीही काट्याची तपासणी उप जिल्हाधिकारी रमेश दराडे साहेब यांनी केली व यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
भाजप जिल्हा परिषद ऋषिकेश शेटे यांनी संताप व्यक्त करीत कारखान्याचे संबंधित असलेले माजी मंत्री शिवतारे यांच्याशी देखील संपर्क साधला ते देखील उद्या कारखान्यात येत आहेत असे ऋषिकेश शेटे यांनी सांगितले. ऋषिकेश शेटे यांनी कारखान्या व्यवस्थापनाला आत्तापर्यंत झालेल्या सर्व उसाच्या गाळपाचे पेमेंटचे फरक शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना तसेच ऊस वाहतूकदारांना आणि ऊसतोड कामगारांना फरक द्यावा अशी मागणी केली आठ दिवसात सर्व झालेल्या गाळपाच्या फरकाची रक्कम न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा दिला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

