नेवासा – नेवासा नगरपंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाचही विषय समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी यांचे मिळून दहा सदस्य असल्याने समोरून पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सभापती पदासाठी अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे सर्व पाचही समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय बिरादार यांनी केली.

नियोजन व विकास समिती या समितीच्या सभापतीपदी सौ. शालिनी संजय सुखधान यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून शोभा प्रताप व्यवहारे व शाहिदाबी इलायतखान पठाण यांची निवड करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण विकास समिती या समितीच्या सभापतीपदी सौ. जयश्री चंद्रकांत शिंदे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून सौ. प्रतिभा जालिंदर गवळी व नसरीन मुक्तार शेख यांची निवड करण्यात आली आहे.
अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती या समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजी धोत्रे यांची निवड झाली असून सदस्य म्हणून शोभा प्रताप व्यवहारे व नसरीन मुक्तार शेख यांची निवड झाली आहे.
पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती या समितीच्या सभापतीपदी जितेंद्र भाऊसाहेब कु-हे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून सौ. सोनल राहुल चव्हाण व सौ. प्रतिभा जालिंदर गवळी यांची निवड करण्यात आली आहे.
स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती या समितीच्या सभापतीपदी स्वप्नील ऊर्फ सागर राजेंद्र मापारी यांची निवड झाली आहे.

सदस्य म्हणून शाहिदाबी इलायतखान पठाण व सोनल राहुल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीच्या वेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान, नगरसेवक राजेंद्र काळे, अॅड. आण्णासाहेब आंबाडे, अॅड. संजय सुखधान, अॅड. रोहित जोशी, अनिल शिंदे, दिनेश व्यवहारे, संदीप बेहळे, असिफ पठाण, आशिष कावरे, राजेंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नगरपंचायतीतील सर्वच समित्यांवर नियंत्रण मिळवल्याने आगामी काळात नगरविकासाच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्व नवनिर्वाचित सभापती यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

