आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

देवगड फाटा (वार्ताहर):माघ पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री गुरूदेव दत्त पीठ, श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रय तसेच श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी झालेल्या महाआरतीला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती

रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासमोर तसेच किसनगिरी बाबा समाधी मंदिर प्रांगणात दिवसभर दर्शनासाठी बारी लागली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचे श्री गुरूदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी स्वागत केले.

यावेळी प्रवरासंगम, नेवासा बुद्रुक, जळके खुर्द तसेच गंगापूर तालुक्यातील पुरी आदी गावांमधून पायी दिंड्यांनी हजेरी लावली. दिंडी चालकांचा श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. दुपारच्या आरतीवेळी मंदिर प्रांगण भक्तांनी फुलून गेले होते आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

देवगड
देवगड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

देवगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!