
नेवासा – पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून सराव करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जावेद शेख (रा. जकाते नगर, श्रीगोंदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनसमोर हिंदुत्ववादी संघटनानी एकत्र येत आरोपीस अटक करून अॅकेडमी बंद करण्याची मागणी केली.

ती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही श्रीगोंदा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती. एकेदिवशी पीडितेने पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले. त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने पीडितेला स्पर्श करू लागला. तिने विरोध करूनही तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले.

सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर धमकी देऊन आरोपीने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने ही बाब शेख याला सांगितली. त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला. लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार देत गजवा-ए-हिंद केले असे म्हणाला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

